
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात १२ वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. सर्व परीक्षार्थ्यांना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोचण्यासाठी प्रशासनाने सोय करावी असं आवाहन केलंय.
भविष्याची एक पायरी पुढे चढावी यासाठी १२ वी चे वर्ष महत्त्वाचे आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ वी चे विद्यार्थी आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा वासियांसह प्रशासनाने सहकार्य करावे. कुणी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर नेण्यास आपणाकडे सहाय्य मागत असेल तर त्याला परीक्षा केंद्रावर पोहचवा असे शेवटी बाबुराव धुरी म्हणाले.