
सावंतवाडी : कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच बहुतांशी लोक ये-जा करीत असतात. त्या अनुषंगाने सावंतवाडी माजगांव नाला ते बांदा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे चराठा ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली. चराठा सरपंच प्रचिती कुबल व सदस्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत याप्रश्नी लक्ष वेधलं.
सावंतवाडी तसेच माजगांव, चराठा येथील व्यापारी तसेच छोट्या दुकानदारांचा विचार करता पर्यटक बाहेरून प्रवास करून गेल्यावर व्यवसायाला फार मोठे नुकसान होते. या सर्व गोष्टींचा विचार करून सावंतवाडी माजगांव ते बांदा हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात मागणी असून ग्रामपंचायतीच्यावतीन याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच लक्ष वेधलं. रस्ता रुंदीकरण करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी चराठे ग्रामपंचायत सरपंच प्रचिती कुबल, सदस्य गौरी गावडे, चराठे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.