दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अथायू हॉस्पिटलचे शिबीर

Edited by: लवू परब
Published on: February 08, 2025 19:15 PM
views 150  views

दोडामार्ग : ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग यांच्यावतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अँजिओप्लास्टि , बायपास, मुतखडा कॅन्सर ऑपरेशन, हाडांची तपासणी यासंदर्भात तपासणी करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजना बाबत माहिती देण्यात आली.

या शिबिरामध्ये जीवनरक्षा सिंधुदुर्गचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आकाश एडके, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव धुरी, डॉ रामदास रेडकर, डॉ लक्ष्मण, डॉ अभय साळुंखे, श्रीमती सुरेखा भणगे, सचिन मोहिते, मदन गोरे, समुपदेशक व सर्व अधीपरीचारीका व ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित  होते. तसेच अथायू हॉस्पिटल कोल्हापूरची टीम उपस्थित होती.