
दोडामार्ग : श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ दोडामार्ग यांच्यावतीने सोमावर १० फेब्रुवारी रोजी श्री विश्वकर्मा प्रकट दिन उत्सव येथील विश्वकर्मा मंदिर झरेबांबर येथे साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ९ ते ११ वाजे पर्यंत देव विश्वकर्मा पूजन, दुपारी आरती व तीर्थ प्रसाद , महाप्रसाद , सायंकाळी ५ वाजता भजन तसेच ६ ते ८ वाजता गोवा येथील संजय चारी यांचे कीर्तन व ८ वाजता हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारीवडे यांचा नाट्य प्रयोग होणार आहे . तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.