
सावंतवाडी : शहरातील करोलवाडा येथील सार्वजनिक विहिरीत जॉन गाब्रियल डिसोजा (65) रा. माठेवाडा याचा मृतदेह बुधवारी पहाटे आढळून आला. जाॅन हा अविवाहित होता तसेच मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याने या स्थितीत विहिरीत उडी टाकली असावी किंवा तो कठड्यावरून विहिरीत कोसळला असावा असा तर्क लढविला जात आहे. त्याचा मृतदेह आज पहाटे स्थानकांना दिसून आला. याबाबत जॉन याचा भाऊ फिलिप याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय कातिवले यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी जात मृतदेहाचा पंचनामा केला.