
दोडामार्ग : पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई व या प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सहकार्याने रविवार दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. सुवर्ण महोत्सव समारंभ २०२४-२५ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भक्तिरस गंधर्व सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा अभंग व भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
हार्मोनियम वादक प्रकाश वगळ, तबलावादक रूपक वझे , पखावजवादक दिनकर भगत, टाळवादक उल्हास दळवी यांसह सहगायक किशोर देसाई यांची संगीतसाथ लाभणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बबन गवस, सचिव प्रमोद गवस, खजिनदार रमाकांत गवस यांनी केले आहे.