
देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे तळेबाजार येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देवी महालक्ष्मी मंदिराचा ३५ वा वर्धापन दिन सोहळा दुर्गाष्टमी बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठया उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्त सकाळ पासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे.
सकाळी ७.०० ते ८.३० वा.: श्री देवी चरणी एकादशमी (अभिषेक) तसेच सकाळी ८.३० ते १०.३० वा.: श्री सत्यनारायण महापुजा सकाळी १० वा.: भजन- श्री आकारी ब्राह्राणदेव प्रासादिक भजन मंडळ, तळवडे खालची धुरीवाडी बुवा दिलीप लवू धुरी भजन-भावईदेवी प्रासादिक भजन मंडळ, वरेरी-राणेवाडी- बुवा- हर्ष गोटू राणे,भजन-श्री अनुभव प्रासादिक भजन मंडळ, तळवडे-अनुभवणेवाडी- बुवा अमर कृष्णा अनुभवणे तसेच सकाळी ११.०० वा. तीर्थप्रसाद सकाळी ११.३० वा.ः समईनृत्य- श्री पावणाईदेवी समईनृत्य, किंजवडे परबवाडी दुपारी १२.०० ते ३.०० वा.ः महाप्रसाद दुपारी १.०० वा. खास आकर्षण डबलबारी भजनाचा जंगी सामना लिंग पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,कणकवली /मुंबई गुरुवर्य - बुवा श्री. गणेश पांचाळ / श्री. भगवान लोकरे यांचे शिष्य बुवा स्वप्निल शंकर गोसावी पखवाज- मनिष घाडीगांवकर, तबला- विघ्नेश तेली विरुद्ध श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,कातवण, ता. देवगड गुरुवर्य - युवा श्री. अभिषेक शिरसाट / श्री. दुर्वास गुरव यांचे शिष्यबुवा श्री. सुशांत दिलीप जोईल पखवाज- तुषार शिंदे, तबला- ओंकार लब्वे रात्री ९ वा. फटाक्यांची आतिशबाजी तसेच रात्रौ ठिक ९वाजता .श्री पावणाईदेवी कलामंच यांचं गाव तसा चांगला पण भांनगडीन भंगला या नाट्य प्रयोगाच सादरीकरण करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी या मंगल सोहळ्यास मित्रपरिवारासह उपस्थित राहून श्री देवी महालक्ष्मीचे शुभाशिर्वाद घ्यावेत,असे आवाहन श्री महालक्ष्मी सेवा मंडळ तळवडे बागतळवडे ,तळेबाजार ,यांच्या वतीने करण्यात आले आहे.