
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या तथागत नागरी पतसंस्था सिंधुदुर्ग संस्थेने आपल्या समाजाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी स्थापन केलेल्या पतसंस्थेतर्फे कर्ज वितरण उपक्रमाला सुरुवात केली आहे.
शनिवारी सुमारे 12 जणांना कर्ज वितरित करून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. कणकवली येथील मुख्य शाखेत हा उपक्रम पार पडला. प्रारंभी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील कदम यांनी आलेल्या एकूण अर्जदारांची माहिती दिली. त्यानुसार उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्या हस्ते चेक वितरित करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सूर्यकांत कदम यांनी पतसंस्थेचा उद्देश सांगून नियमित हप्ते भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. कर्जदार असाल तरीही बँकेचे हिस्सेदार आहात याचे भान ठेवा आणि नियमित हप्ते भरा व पतपेढी नावारूपाला आणा असे आवाहन त्यांनी केले. पतसंस्थेचा पाया हा कर्जदार आहे असे सांगून पतसंस्थेचे विविध उपक्रम त्याने स्पष्ट केले. कोणालाही फोन अथवा तुमच्या दारात येण्याची पाळी आमच्यावर आणू नका असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तज्ञ संचालक प्रमोद कसले, संचालक मोहन जाधव, मिलिंद सर्पे, श्रद्धा कदम, के स .कदम, रूपाली पेंढुरकर, सिद्धार्थ कदम, कांता जाधव आदी संचालक उपस्थित होते. तसेच कर्जदार व संघटनेचे पदाधिकारी प्रकाश कदम, सूहास कदम इत्यादि उपस्थित होते.