विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया शाळेतच रचला जातो : संजय सावंत

विलवडे टेंबवाडी शाळा नं. २चं स्नेहसंमेलन उत्साहात
Edited by: विनायक गांवस
Published on: February 04, 2025 14:05 PM
views 163  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या पाया प्राथमिक शाळेतच रचला जातो. त्यामुळे  जीवनातील यश हे प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असते. विलवडे शाळा नं. २ पटसंख्येने लहान आहे. मात्र, शिक्षक- पालक आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून या शाळेतील विविध कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन विलवडे गावचे सुपुत्र तथा मुंबईस्थित निवृत्त कार्यकारी अभियंता मुंबईचे संजय सावंत यांनी केले.        

विलवडे टेंबवाडी शाळा नं. २ च्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून संजय सावंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रश्मी सावंत, उपाध्यक्षा  विशाखा दळवी, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी अध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब, डेगवे मुख्याध्यापक रमेश शिंदे, डेगवे-मिरेखण शाळेचे मुख्याध्यापक आनंद कोळापटे, विलवडे शाळा नं १ चे मुख्याध्यापक मनोहर गवस, शिक्षिका भारती देसाई, मालू लांबर, चंद्रकांत परब, आरोही सावंत, भिकाजी दळवी, आबा परब, बाळकृष्ण दळवी, जितेंद्र दळवी, विश्वनाथ सावंत, रमण सावंत, सुधाकर गवस, भालचंद्र गवस, लक्ष्मण सावंत, दिनेश सावंत, गुणाजी सावंत, सुशांत गवस आदी उपस्थित होते. 

यावेळी प्रकाश दळवी, कृष्णा सावंत, विजय गावडे आदींनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. संजय महादेव सावंत यांनी शाळेला सरस्वतीची आकर्षक मूर्ती प्रदान करून शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी दरवर्षी ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तर विलास  मुकूंद सावंत यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ अखंड बक्षिस योजनेसाठी ५ हजार रुपयाची कायम ठेव दिली. याबद्दल या दोघांचाही शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी 'रंगबहार २०२५' या बहारदार कार्यक्रमात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी  लोकनृत्ये सादर करुन रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती पालक ग्रामस्थ यांनी केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश काळे, सुत्रसंचालन प्रमिला ठाकर व प्रियांका सावंत तर आभार सुरेश सावंत यांनी मानले. या कार्यक्रमाला पूर्वा दळवी, मानसी सावंत, समिधा सावंत, जान्हवी दळवी, श्रीराम सावंत, सुमिक्षा सावंत, श्रावणी सावंत, प्राजक्ता दळवी, सुधाकर सावंत, अपर्णा  दळवी, परेश धर्णे, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मनाली दळवी, आत्माराम दळवी, अजित सावंत, संतोष कानसे, दत्ताराम सावंत मनोज दळवी, सोनू दळवी, संजय रा. सावंत, सुभाष कानसे, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.