सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जिल्हाकार्यक्षेत्रातील आंबोली येथे पोलीस चेकपोस्ट शेजारी शेतमाल तपासणी नाका बुधवार दि. जानेवारी पासून सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली आहे.
बाजार समितीच्या शेतमाल तपासणी नाका आंबोलीचे उद्घाटन आंबोली सरपंच सावित्री संतोष पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निता कर्पे, छाया नार्वेकर, रामचंद्र गावडे, बाळा सावंत, नमिता राऊत व संतोष पाळेकर तसेच बाजार समिती प्र. सचिव प्रकाश दळवी व कर्मचारी उपस्थित होते. आंबोली येथील तपासणी नाक्याच्या ठिकाणी शेतमाल वहातुक करणारी वाहने तपासणीकरिता थांबवावी, असे आवाहन बाजार समिती सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांनी केले आहे.