
सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त येथील अर्धवट टाकलेला रस्ता 15 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे व ठेकेदार अमेय आरोंदेकर यांनी कलंबिस्त येथील शिष्टमंडळास दिली.
सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त मळा ते गणशेळवाडी शिरशिंगे गोटेवाडी असा सुमारे सात किमी अंतराचा रस्त्यास अडीच कोटी रुपये विशेष योजनातून मंजूर झाले आहेत. यापैकी जवळपास दोन किमी अंतराचा रस्ता गेल्या मे महिन्यात डांबरीकरण खडीकरण करून अर्धवट स्थिती ठेवण्यात आला. दरम्यान, अर्धवट स्थित असलेल्या रस्त्यावर कार्पेट व गटार आदी सर्व कामे येत्या 15 जानेवारी पासून ते 15 फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत हा संपूर्ण रस्ता पूर्ण करण्याची हमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे व ठेकेदार अमेय आरोंदेकर यांनी कलंबिस्त गावातील तरुण मंडळांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे ,भाजपचे संदेश बिड्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय कदम माजी सरपंच कृष्णा उर्फ बाळू सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत बाबा पास्ते विठ्ठल उर्फ गोठ्या. सावंत सचिन सावंत.कुसजी सावंत, प्रथमेश सावंत, चेतन सावंत, संतोष सावंत नामदेव पास्ते, , सखाराम उर्फ बाबू न्हानू सावंत, , एडवोकेट संतोष सावंत. शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय पालकर, गौरव बिड्ये, आदी उपस्थित होते.