झोळंबेच्या माऊलीचा 31 डिसेंबरला जत्रोत्सव

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 30, 2024 18:56 PM
views 174  views

दोडामार्ग : श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी  ख्याती असणाऱ्या झोळंबे श्री देवी माऊलीच्या जत्रौत्सवानिमित्ताने सकाळी  १० वाजता कुळ घराकडून सवाद्य देवतांचे आगमन मंदिरात होणार आहे. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे . सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणेचा कार्यक्रम सुरु होणार आहेत. 

 रात्री १२ वाजता सवाद्य पालखी सोहळा,  १ वाजता पावणीचा कार्यक्रम व  रात्री २ वाजता नाईक  दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड वेंगुर्ला यांचे दणदणीत पौराणिक दशावतारी नाटक होणार आहे.  तरी सर्व भाविकांनी  कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती झोळंबे  व ग्रामस्थांनी केले आहे.