'जल जीवन मिशन' मध्ये ग्रामसंघाची भूमिका महत्वाची

इंदिरा परब यांचे प्रतिपादन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 30, 2024 18:35 PM
views 395  views

देवगड : जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी नियोजन, आराखडा, अंमलबजावणी, व्यवस्थापन, तसेच देखभाल दुरुस्ती यासाठी ग्रामस्तरावर ग्रामसंघाची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन क्षमता बांधणी व प्रशिक्षण ( JJM ) समन्वयक इंदिरा परब यांनी केली. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावांमध्ये अंमलबजावणीसाठी सहाय्य संस्था म्हणून इच्छुक व सक्षम ग्रामसंघाची निवड करणेबाबत तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बचत गटांची नियुक्ती करणेबाबतची कार्यशाळा सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती देवगड सभागृहात पार पडली.     

यावेळी अधिक्षक कुणाल मांजरेकर, मास्टर ट्रेनर इंदिरा परब, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, डाटा ऑपरेटर मोहिनी खडपकर, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा पोवार आदी मान्यवर तसेच देवगड तालुक्यातील ग्रामसंघाची अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

 या कार्यशाळेत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापना, पुनरुजीवन करणे , अपेक्षित लोकवर्गनी गोळा करणे, योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी व्यवस्था निर्माण करणे, समित्यांचे बैठकीचे आयोजन करणे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इ . विषयांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीस सहाय्यक करणे अशा अनेक प्रकारच्या ग्रामसंघाने करावयाची कार्याचे मार्गदर्शन मास्टर ट्रेनर इंदिरा परब व सहाय्यक गटविकास अधिकारी देवगड दिगंबर खराडे यांनी केले .

या कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार विनायक धुरी यांनी मानले .