
सावंतवाडी : बांदा ग्रामस्थांची पदयात्रा मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी प.पू.ब्रम्हलीन सद्गुरू श्रीनवनीतानंद महाराज ( मोडक महाराज ) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे जाणार आहे. तसेच त्या पुढची पदयात्रा 7 जानेवारी रोजी कास येथील श्री वाघबिळकार देवस्थान येथे जाणार आहे असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी कळविले असून उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.