
सावंतवाडी : कारागृहाचे तटभिंतीचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचा वापर करण्याबाबत मुख्याधिकारी यांचे कारागृह अधिक्षकांनी लक्ष वेधल.सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे कामकाज जिल्हा अधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत मंजूर झाले असल्याने सद्य स्थितीस सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून तटभिंतीचे उंची वाढविण्याचे कामकाज सुरु आहे.
बांधकामाकरिता दगडी चिरासह आरसीसी बांधकाम आहे. बांधकाम करताना कारागृहाच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील दैनंदिन वाहतुकीस असणाऱ्या रसत्यावर दगडी चिरे व रेती, वाळू इ. टाकले जाणार असल्याने नागरीकांना वाहतूक करणे शक्य होणार नाही. तसेच वाहतूक बंद न ठेवल्यास नागरिकांच्या जिवीतास हानी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता कारागृहाच्या पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम करताना तटभिंतीस लागून असलेले दोन्हीही रस्ते वाहतूकीकरीता दिनांक ३० डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे सावंतवाडीतील नागरीकांना कारागृहाच्या तटभिंतीचे पश्चिमेकडील बाजूचे व दक्षिणेकडील बाजूचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात यावे अशी मागणी जिल्हा कारागृह अधिक्षक संदीप एकशिंगे यांनी केली आहे.