
सावंतवाडी : सावंतवाडी भटवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३६ वा वर्धापन दिन शनिवार ४ जानेवारी २०२५ (पौष शु.५) रोजी आहे. या निमित्ताने श्री दत्त मंदिर, भटवाडी, सावंतवाडी येथे रात्री ठिक ८.०० वाजता संगीतसेवेचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी येथील सुप्रसिध्द गायिका विनया विराज परब (पं. सुधाकर करंदीकर, डॉ. हनुमंत बर्लि, विदुर्षी डॉ. अलका देव मारुलकर) ह्यांच्या शिष्या व नामवंत गायक हेमंत काशिनाथ देशमुख (वसंत ओक व देविदास दातार) यांचे शिष्य यांची अभंग, नाट्यगीत, भक्तीगीत इ. विविध रुपातील गायन मैफील सजणार आहे. त्यांना संवादिनी साथ निलेश मेस्त्री, तबला साथ किशोर सावंत आणि निवेदक संजय कात्रे करणार आहेत. सर्व भक्तमंडळी व संगीत रसिकांनी या सुरेल कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अस आवाहन श्री दत्त मंदिर आरती परिवार भटवाडी, सावंतवाडी यांनी केल आहे.