माजी कबड्डीपटू स्नेहमेळाव्यानिमित्त मैदानात

दीपक केसरकर, लखमराजेंकडून शुभेच्छा
Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2024 14:25 PM
views 291  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा माजी कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झालं. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत होती.

सिंधुदुर्ग जिल्हा माजी कबड्डीपटू यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन १९८ ते २००० या कालावधीत ज्या कबड्डी खेळाडूंनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्यासाठी प्रतिकुल परिस्थितीत भरीव कामगिरी केली त्या सर्व माजी खेळाडूंचा स्नेह मेळावा श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे संपन्न झाला.युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झालं. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले यांनी कब्बडीपटूंना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व माजी कबड्डी खेळाडूंचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, माजी खेळाडू अध्यक्ष, निवृत्त जिल्हा अधिकारी, वनविभाग रणजीत राणे, कवी रुजारिओ पिंटो,, प्रशांत वारिक, जया चुडनाईक, प्रकाश बिद्रे, अनिल हळदिवे, संजय भोगटे, सोमनाथ गोंधळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दिवंगत माजी खेळाडूंना श्रध्दांजली वाहण्यात आली. शिक्षक, पंच, मार्गदर्शक यांचा सत्कार व मनोगत तसेच खेळाडूंनी मनोगत व्यक्त केली. पाहुण्यांचे मार्गदर्शन, अध्यक्षीय मनोगत, सावंतवाडीतील आगामी कब्बडी खेळाबाबत मार्गदर्शन पार पडलं. सायंकाळी निरोप समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व राष्ट्रीय पंच जावेद शेख, वसंत जाधव, वसंत जाधव, सुरेंद्र बांदेकर, प्रकाश बिद्रे, शिवप्रसाद बांदेकर जिल्हाभरातील कब्बडीपटू‌ उपस्थित होते.