सिंधुदुर्ग काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी ऍड. गुरुनाथ आईर

Edited by: संदीप देसाई
Published on: October 31, 2024 19:15 PM
views 234  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी ऍड. गुरुनाथ आईर यांची निवड करण्यात आली. गुरुनाथ आईर हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकीली क्षेत्रामध्ये काम करत असून त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांची ओळख हि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहे. श्री. आईर यांनी यापूर्वी सांगेली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केल्यामुळे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना जिल्हाचे प्रतिनिधित्व करावे अशी मागणी करण्यात आली.

त्यामुळे त्यांची जिल्हा सचिव पदी निवड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. आज त्यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर,ओबीसी सेलचे  तालुका अध्यक्ष अभय मालवणकर, सेवादल तालुका अध्यक्ष संजय लाड, तालुका सरचिटणीस रुपेश आईर, तालुका उपाध्यक्ष शिवाभाई गावडे, चंद्रकांत राणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.