ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची गोपूरी आश्रमास भेट

गोपुरी आश्रमाच्या सामाजिक कामाबद्दल समाधान
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 24, 2026 19:45 PM
views 29  views

कणकवली : ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी शनिवारी गोपुरी आश्रमाला आवर्जून भेट देऊन गोपुरी आश्रमाच्या सामाजिक कामाची माहिती घेतली. गोपूरी आश्रमाच्या माध्यमातून सध्या जे उपक्रम सुरू आहेत, त्याबद्दल समाधान व्यक्त करून, सामाजिक संस्थांना समाजाने आर्थिक पाठबळ दिल्यास त्या प्रभावीपणे ‘माणूस’ घडवण्याचे काम करू शकतील, असे आवाहनही संजय आवटे यांनी केले. 

यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, पत्रकार विवेक ताम्हणकर,अॅड. स्वाती तेली, युवा कार्यकर्ते  प्रदीप मांजरेकर, गोपुरी आश्रमाचे  व्यवस्थापक सदाशिव राणे आदी मान्यवर उपस्थित होते. गोपूरीच्या टीमने अप्पासाहेब पटवर्धन यांचे विचार आणि कार्य आजही सक्षमपणे सुरू ठेवले आहे, याबद्दल मला विशेष आनंद होत आहे, असे उद्गारही आवटे यांनी काढले.