श्री रासाई मंडळाच्यावतीने तेंडुलकर कुटुंबांला मदत

Edited by: विनायक गांवस
Published on: October 30, 2024 10:28 AM
views 226  views

सावंतवाडी : लाखेवस्तीमधून श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडीने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या तेंडुलकर कुटुंबांना मंडळाच्या  पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन नवरात्रीला जमा झालेल्या अन्न धान्यातून नारळ, तेल, तांदूळ, डाळ,तेल, या वस्तूच्या स्वरूपात मदत केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितेश पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे, तसेच युवा मंडळाचे अध्यक्ष पवन पाटील, तसेच गणेश खोरागडे, साई लाखे, उपस्थित होते. 

यावेळी तेंडुलकर कुटुंबांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मंडळाचे मनापासून आभार मानले. लाखे वस्तीमधून मला मदतीचा हात आला याची अपेक्षा नव्हती. लाखेवस्ती फक्त घेणारे लोक नाही आहेत. तर आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या लोकांना मदत करणारे देखील आहेत असे बोलून दाखवले. तसेच तेंडुलकर कुटुंबांची भेट, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांच्या माध्यमातून मंडळाला घडवून आणली. यांचे देखील आभार तेंडुलकर कुटुंबियांनी यांनी व्यक्त केले.