
सावंतवाडी : लोकमान्य म्युझिकल ॲण्ड चप्पल मार्ट, सावंतवाडी या दुकानाचे मालक यशवंत नारायण वाडीकर यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 102 वर्षाचे होते. जिल्हा न्यायालयाचे निवृत्त अधीक्षक व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष श्री. भाग्यवंत ( राजा ) वाडीकर यांचे वडील होत.
स्वतंत्रकाळा पूर्वीपासून काँग्रेसचे ते कट्टर समर्थक होते. सावंतवाडी संस्थानशी त्यांचे चांगले संबंध होते. घोड्यांना लागणाऱ्या लगाम बनवण्याचे काम त्या काळात वाडीकर यांच्याकडून होत असे. सावंतवाडी मध्ये स्थायीक होण्यासाठी संस्थांनने त्यांना जमीन दिली होती. त्याच काळात अंदाजे ७५ वर्षापूर्वी त्यांनी लोकमान्य चप्पल मार्टचे दुकान सुरू केले. सावंतवाडीतील सर्वात वृद्ध व जानकार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. विठ्ठलाचे ते निश्चिम भक्त होते. न चुकता ते सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असत.
यांच्या पक्षात चार मुली, दोन मुलगे, जावई जावई, सुना, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.