
खेेड : आज गुरुवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०२४ रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्या वतीने खेडमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असे नाव, मुरली मनोहर पतसंस्थेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक , सहजीवन शिक्षण संस्थेचे प्राथमिक विभागाचे चेअरमन संजय मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खेड वेरळ येथील विशेष मुलांची शाळा, 'अनुग्रह' येथील विद्यार्थ्यांना खाऊ व फळांचे वाटप करण्यात आले. मुलांमध्ये एकरूप होऊन संजय मोदी यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला. एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने लायन्स क्लबच्या वतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल श्री.मोदी खूप भाऊक झाले. त्याप्रसंगी लायन्स क्लब खेड सिटी चे अध्यक्ष सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे , पंकजभाई शहा, स्नेहज्योती अंध विद्यालय चे अध्यक्ष उत्तमकुमार जैन आदी मान्यवर उपस्थित होते.