
दोडामार्ग : तालुक्यातील पाळये येथील चंद्रकांत सूर्यकांत दळवी ( 22 ) या युवकाने विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना आज घडली आहे. मात्र आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
याबत अधिक माहिती अशी की चंद्रकांत दळवी हा युवक नोकरी निमित्त मुंबई येथे होता. काल बुधवारी त्याने आपल्या पाळये येथील राहत्या घरी ग्लायसिल हे वनस्पतीवर मारणारे औषध प्राशन केले. ही बाब घरतील नातेवाईकांना समजताच त्यांनी गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठवले. मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राण ज्योत विझली ही घटना आज पाळये गावात समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्या मित्र परिवारात ही हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडली, 2 भावू असा परिवार आहे.