
रत्नागिरी : जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथील जगबुडी नदीवरील नवीन मोठ्या पुलाला भगदाड पडलंय.
मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. ठेकेदाराचे ढीसाळ काम आणि शासनाची या महामार्गाबाबतची निष्क्रियता यामुळे वारंवार होणार्या अपघात, पडझड समोर येत आहे.याचाच आणखी एक नमुना म्हणजे खेड तालुक्यातील भरणे नाक्याजवळील जगबुडी नदीवर कोट्यावधी खर्चुन नुकताच नवीन उभारलेल्या पुलाला मोठी भेग पडली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी पुलावरची मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुला वरून सुरु आहे. जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून महामार्गाची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. सध्या जगबुडी नदीवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच पुलावरून सुरु आहे.