LIVE UPDATES

BJP FOR YOUTH उपक्रमांतर्गत विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 21:54 PM
views 36  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या 'BJP FOR YOUTH' या उपक्रमांतर्गत विद्या विहार इंग्लिश स्कूल, आरोस-दांडेली येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा मार्गदर्शक विनोद राऊळ यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ झाला. याबद्दल शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी अक्षय नाईक (भाजप कार्यकर्ता), श्रीधर नार्वेकर (युवा कार्यकर्ता, भाजप – आरोस), रुपेश मोरजकर (भूतपूर्व अध्यक्ष, भाजप – दांडेली), सार्थक नाईक, प्रज्योत मालवणकर (सामाजिक कार्यकर्ते, आरोस-दांडेली), हरी नाईक, दीपक नाईक उपस्थित होते.

शिक्षणाला प्रोत्साहन देणारे असे सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारे ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.