
कणकवली. : मूळ वरवडे - बौद्धवाडी व सध्या कलमठ - गावडेवाडी (ओमगणेश कॉलनी) येथे स्थायिक असलेले तुकाराम शिवा वरवडेकर (वय ८३) यांचे गुरुवारी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने कणकवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, सून, जावई, दोन नातू असा परिवार आहे.
तुकाराम यांनी ३३ वर्षे पोस्ट खात्यामध्ये पॅकर म्हणून सेवा बजावली. २००२ साली ते पडेल (ता. देवगड) पोस्ट कार्यालय येथून सेवानिवृत्त झाले होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
विजयदूर्ग हायस्कूलच्या शिक्षिका सौ. सुमेधा पडेलकर (सूमन वरवडेकर), नविन कुर्ली वसाहत प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी वरवडेकर, एसएम हायस्कूलच्या शिक्षिका रुपाली वरवडेकर, ओरोस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक अमोल वरवडेकर, 'कोकणसाद'चे पत्रकार स्वप्नील वरवडेकर यांचे ते वडील तर पडेल हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक जीतेंद्र पडेलकर, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या एक्सरे टेक्निशियन सौ. सोनाली वरवडेकर यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर आज वरवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.










