
सावंतवाडी: नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमंती कल्पना बोवलेकर यांचा सेवानिवृत्तीपर केलेल्या निरोप समारंभात भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
नेमळे शिक्षण संस्थेचेअध्यक्ष अध्यक्ष आ.भी.राऊळ सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यकार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर,सचिव स.पा.आळवे,सरपंच दीपिका भैरे,माजी प्राचार्य दीपक साधले,शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,सौ.राऊळ मॅडम,माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्रीकृष्ण म्हाडेश्वर,तुकाराम गुडेकर ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप भैरे,आर.के.राठोड,सुभाष हळदणकर,भानुदास गावकर,जयंत वेंगुर्लेकर,गुरुदास वाघाटे यांच्या उपस्थितीत संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ सर यांच्या हस्ते शाल,श्रीफल,बुके,चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन प्राचार्या कल्पना बोवलेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.भि.राऊळ सर म्हणाले,"बोवलेकर मॅडम यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्यभार व्यवस्थित चांगला चालवला.त्यांच्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सुयश मिळवले.शाळेचा निकाल चांगला लागला आहे."असे उद्गार काढले.
शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर सरांचा ही सत्कार करण्यात आला.ते बोवलेकर मॅडम यांना शुभेच्छा देताना म्हणाले,"नेमळे शाळा ही उपक्रमशील शाळा असून अनेक स्पर्धेत याशाळेतील विद्यार्थी आपली चमक दाखवतात.माझा सत्कार केल्याबद्दल संस्थेचेअध्यक्ष आ.भि.राऊळ सर , शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.बोवलेकर मॅडम यांनी मायेचा हात,मुक्याप्राण्यांवर प्रेम,माणुसकीचे खऱ्या अर्थाने धडे प्राचार्य बोवलेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिले." असे वेतुरेकर सर म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्रीमती कल्पना बोवलेकर म्हणाल्या,"वडिलांनी व आईने केलेले संस्कार यामुळेच घडले.वाचनाची आवड वडिलांनीच लावली.प्राण्यांची हिंसा करू नये.30 वर्षात प्रामाणिकपणे सेवा केली.शाळेतील मुलांनी केलेले प्रेम कधीही विसरणार नाही.संस्थेचे सहकार्य चांगले लाभल्यामुळे तसेच सहकारी शिक्षकांच्यामुळेच शाळेसाठी चांगले कार्य करु शकले."असे मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आर.के.राठोड यांनी केले.सन्मानपत्राचे वाचन नितीन धामापूरकर यांनी केले.माजी प्राचार्य दीपक साधले,सरपंच दीपिका भैरे,सिध्दार्थ तांबे,समीर चांदरकर, आनंद राऊळ,प्रदीप सावंत ,श्रीकृष्ण म्हाडेश्वर,राजन मडवळ,राजेश गुडेकर,उमेश राऊळ यांची भाषणे झाली.
शाळेतील विद्यार्थी निमिष राऊळ, वैभवी पाटकर, चिन्मय राऊळ,भार्गवी आळवे, मिताली खोत, जान्हवी राऊळ, अनुष्का नाईक, सोनाक्षी दळवी, सानिका राऊळ, निधी धुरी या विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या व शुभेच्छा पत्रांचे वाचन केले.
यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग वर्ग, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले. आभार पांडुरंग दळवी यांनी मानले.











