सावंतवाडीत ६९.३६ टक्के मतदान

Edited by: विनायक गांवस
Published on: December 03, 2025 20:01 PM
views 15  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदारांनी आपला हक्क बजावत एकूण ६९.३६% मतदानाची नोंद केली. एकूण १९ हजार ४२९ मतदारांपैकी १३ हजार ४७५ मतदारांनी  मतदान केले.

यात ६,९१७ महिला मतदारांनी तर ६,५५२ पुरुष मतदारांपेक्षा मतदानाचा हक्क बजावला आहे. बुथनिहाय मतदानाचे प्रमाण निश्चितच लक्षणीय ठरले. काही विभागांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. या निवडणुकीत सर्वात चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक ७/अ येथे मतदारांनी सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बुथवर ६२८ मतदान झालं असून  ७५.०३%  इतकी विक्रमी नोंद झालीय. याउलट प्रभाग क्रमांक ८/अ येथे मतदारांचा प्रतिसाद सर्वात कमी राहिला. जेथे ५५१ मतदान ६२.९०% टक्केवारी नोंदवण्यात आली. शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासह अपक्षांच भवितव्य मतपेटीत कैद झाल असून २१ डिसेंबरला जनतेनं आपला कौल कुणाला दिला ? हे जाहीर होणार आहे‌. 


बुथनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :

बुथ क्रमांक १/१: ६९३ मते (६६.४४%)

बुथ क्रमांक १/२: ७३२ मते (६७.५३%)

बुथ क्रमांक २/१: ५२६ मते (७२.३५%)

बुथ क्रमांक २/२: ४९२ मते (६९.३०%)

बुथ क्रमांक २/३: ६६६ मते (७४.२५%)

बुथ क्रमांक ३/१: ७४८ मते (७०.७७%)

बुथ क्रमांक ३/२: ७१८ मते (६७.९३%)

बुथ क्रमांक ४/१: ८१२ मते (७१.९२%)

बुथ क्रमांक ४/२: ५९० मते (६५.१२%)

बुथ क्रमांक ५/१: ७५१ मते (६९.८६%)

बुथ क्रमांक ५/२: ६९६ मते (७२.८०%)

बुथ क्रमांक ६/१: ५३१ मते (७०.८९%)

बुथ क्रमांक ६/२: ५१४ मते (६५.९०%)

बुथ क्रमांक ७/१: ६२८ मते (७५.०३%)

बुथ क्रमांक ७/२: ६६५ मते (७१.५८%)

बुथ क्रमांक ८/१: ५५१ मते (६२.९०%)

बुथ क्रमांक ८/२: ६१२ मते (६६.९६%)

बुथ क्रमांक ९/१: ४८४ मते (६८.२७%)

बुथ क्रमांक ९/२: ६१६ मते (७०.१६%)

बुथ क्रमांक १०/१: ७०५ मते (६६.६४%)

बुथ क्रमांक १०/२: ७४५ मते (७०.४२%)