
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण १२५ अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी ११ अर्ज दाखल झालेत. तर नगरसेवक पदासाठी ११४ अर्ज दाखल करण्यात आलेत. थोड्याच वेळात अर्ज छाननीला सुरूवात होणार असून यातील काही अर्ज बाद होणार आहेत.
निवडणूक कक्षात ही प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नेमके किती अर्ज बाद होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छाननी नंतर २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे आजच्या छाननीकडे सर्व उमेदवारांच लक्ष लागून राहिले आहे.










