
देवगड : मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) तुषार हळदणकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वय अधिवास दाखल्यांचे वाटप मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत वय अधिवास प्रमाणपत्र मिठमुंबरी शाळेमध्ये कॅम्प आयोजन करून दाखले तयार करण्याची मोहीम राबवली व दाखले उपलब्ध करूनही दिले.
सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तिथे दाखले या अभियानात सरपंच गांवकर, विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) तुषार हळदणकर , सरपंच बाळकृष्ण गांवकर, मुख्याध्यापक मधुसूदन घोडे सर, ग्राम पंचायत सदस्या सरीता वाघट, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिल्पा गांवकर, शिक्षक सुरेश साळुंके, सचिन धुरी, आरती ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रिती ठोंबरे, डाटा ऑपरेटर विनिता मुंबरकर आदी मान्यवरांच्या हस्ते जि.प. शाळा मिठमुंबरी येथे मुलांना अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानअंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याच अनुषगाने जि.प. शाळा मिठमुंबरी शाळा येथे २९ वय अधिवास प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला विदयार्थी, पालक, अंगणवाडी सेविका, शिक्षकवृंद, ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक मधुसुदन घोडे व आभार सरपंच बाळकृष्ण गांवकर यांनी मानले.










