भाजप वेंगुर्लेच्यावतीने मोदी @11 मंडळ कार्यशाळा

Edited by: दीपेश परब
Published on: June 19, 2025 10:10 AM
views 132  views

वेंगुर्ला  : भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला यांच्या वतीने नुकतीच मोदी @11 मंडळ कार्यशाळा उत्साहात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांमध्ये केलेल्या जनहितार्थ कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी केले. प्रास्ताविक करताना जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभूखानोलकर यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख वक्त्याच्या भाषणास प्रारंभ करण्यापूर्वी अहमदाबाद येथील एअर इंडिया दुर्घटनेतील मृत व्यक्ती, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे वडील कै. प्रकाश दळवी, शिरोडा येथील भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते कै. मनोहर होडावडेकर, कै. हरिश्चंद्र परब, आणि तुळस येथील भाजपा माजी बूथ अध्यक्ष कै. कृष्णा राऊळ या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली.

     या कार्यशाळेचे मुख्य वक्ते म्हणून भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ उर्फ राजू राऊळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीवर सखोल माहिती दिली. वैभव होडावडेकर यांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले.

   यावेळी माहिती पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आले, ज्यामुळे मोदी सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी मोदी सरकारने सुरू केलेल्या विविध महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली. मच्छिमार सेलचे दादा केळुसकर यांनी मच्छीमार योजना, दशरथ गडेकर यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, शमिका बांदेकर यांनी लाडकी बहिण योजना, पूजा कर्पे यांनी आरोग्य योजनांचे महत्त्व, वृंदा मोर्डेकर यांनी सौरऊर्जा योजना, उर्वी गावडे यांनी योगा आणि आरोग्याचे योगदान, राहुल मोर्डेकर यांनी UPI योजना, अभिषेक वेंगुर्लेकर यांनी GST प्रणालीचे फायदे,  राजन गिरप यांनी करप्रणाली आणि पारदर्शकता यांनी मयुरी वडाचेपाटकर GDP आणि भारताची आर्थिक उन्नती यावर माहिती दिली. 

    यावेळी कार्यशाळेस प्रदेश निमंत्रीत सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा निमंत्रीत सदस्य  साईप्रसाद नाईक, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, शहराध्यक्ष श्रेया मयेकर ,माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, युवा मोर्चा चे अध्यक्ष प्रणव वायंगणकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष शेटकर , सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण परब, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष बाळा जाधव, मच्छिमार सेलचे वसंत तांडेल तसेच सर्व जिल्हा, तालुका कार्यकारणी सदस्य, सर्व  मोर्चाचे पदाधिकारी , सर्व शक्तिकेंद्र प्रमुख,बूथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.