जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांना पितृशोक

Edited by: दीपेश परब
Published on: June 07, 2025 09:40 AM
views 895  views

वेंगुर्ला : तालुक्यातील होडावडा- भोजदळवीवाडी येथील रहिवासी प्रकाश सेनापती दळवी (वय -७५)  यांचे गोवा बांबुळी येथे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांच्यावर होडावडा येथे आज सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे ते वडील होत.