बेळगाव - सावंतवाडी उभागुंडा परिसरात रस्त्यावर माती

Edited by: विनायक गावस
Published on: May 20, 2025 20:27 PM
views 190  views

सावंतवाडी : तालुक्यातील बेळगाव सावंतवाडी रस्त्यावर उभागुंडा परिसरात माती रस्त्यावर आली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


सायबीन चॅपेल जवळ उभागुंडा परिसर कारिवडे येथे रस्त्यावर माती आली आहे. रस्त्या शेजारील माती अवकाळी पावसाने खाली आली आहे. येथून प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौकेकर यांनी केल आहे