
सिंधुदुर्गनगरी : ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने 'सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव -2024' चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव रविवार दि.23 आणि 24 मार्च 2025 रोजी पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.या ग्रंथोस्थवा निमित्त ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि श्रीफळ वाडाउन ग्रंथ दिंडीची सुरुवात ओरोस सरपंच आणि उप सरपंच तसेच ग्रंथालय अधिकारी आणि ग्रंथ प्रेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.