
वैभववाडी : कुंभवडे होळीचा माड येथे श्री स्वामी समर्थ कलामंच साखरपा निर्मित "बहुरंगी नमन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 20मार्च रोजी रात्री १०वा.होळीचा मांड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये भक्तिमय गण, श्रीपात्रांची नटलेली नटखट शृंगारिक गवळण, पेंद्या सुदामाची आगळीवेगळी धम्माल, शिपाई ६१-६१ची अफलातून कॉमेडी वगनाट्य सादर केले जाणार आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.