आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली : डॉ . चित्रा पाटील

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2025 16:43 PM
views 239  views

देवगड : आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असुन  महिलांनी विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वैदयकिय अधिकारी डॉ . चित्रा पाटील यांनी पं .स देवगड आयोजीत महिला व मुलींसाठी कायदेविषयक व आरोग्य बाबत प्रशिक्षणात केले.

 पंचायत समिती देवगड आयोजीत महिला व  मुलींना कायदेविषयक व आरोग्य विषयक प्रशिक्षण  इंद्रप्रस्थ सभागृहात   प्रकल्प अधिकारी देवगड बाबली होडावडेकर व अधिक्षक कुणाल मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या महिला मेळाव्यात वकिल संगिता कालेकर यांनी कोंटुबिक हिंसाचार कायदा २००५ तसेच महिलासंदर्भातील कायद्यांची माहिती लोकांना नसल्यामुळे विविध प्रकरच्या अन्याय आत्याचारास सामोरे जावे लागते. अन्याय होण्यापूर्वी त्याला प्रतिबंध करणे महत्वाचे आहे. यासाठी कायदे संदर्भातील ज्ञान महिलांना सक्षम बनविणारे ठरेल. पोस्को कायदा, महिलांसाठी विविध कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांना सक्षम होताना कायद्याची साथ अत्यंत आवश्यक आहे असे ठाम मतही त्यांनी मांडले.  त्यांनतर वैद्यकिय अधिकारी डॉ . चित्रा पाटील यांनी महिलांच्या आरोग्यात मासिक पाळी आणि गर्भधारणा ,हृदयरोग आणि मधुमेह यासारख्या समस्यांमध्ये महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे होणारे परिणाम , तसेच स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग यासारख्या समस्यांबाबत माहिती दिली . तसेच देवगड पोलीस स्टेशनचे  महिला हवालदार अन्विता कदम यांनी महिला संरक्षण कायदेबाबत माहिती दिली . तसेच आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु यांनी पाणी व स्वच्छतेबाबत माहीती दिली.

यावेळी व्यासपिठावर तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन सुशांत कदम, विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर, पोलीस कॉन्टेबल प्रियांका देवगडकर, देवगड न्यायालयाचे वरीष्ठ लिपिक एस .आर. जाधव, पं.स देवगडचे कनिष्ठ सहाय्यक संजय महाले, दत्तगुरू सांगळे, गौरव कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील  २५० हुन अधिक महिला व मुली उपस्थित होत्या. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन विनायक धुरी तर आभार प्रतिमा वळंजु यांनी मानले .