
सिंधुदुर्गनगरी : आगामी सुट्टीच्या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्र किनारी पर्यटनासाठी येणार आहेत. यापूर्वी पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी झालेल्या दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने सर्वच विभागांनी एकत्र येवून भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी कार्यवाही करावी आदी सुचना जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील अधिनस्थ सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सागरी पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच, महसूल विभाग, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, बंदर विभाग, मत्स्य विभाग, पर्यटन विभाग, कस्टम विभाग, सागरी प्रदेशातील नगरपरिषदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पतन विभाग, जिल्हा नगर विकास विभाग, वन विभाग यांची व्ही. सी. व्दारे संयुक्तीक बैठक घेवून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला.
आगामी सुट्टीच्या कालावधीत पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्र किनारी पर्यटनासाठी येणार आहेत. यापूर्वी पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी झालेल्या दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने सर्वच विभागांनी एकत्र येवून भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
यामध्ये सर्व सागरी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी तहसिलदार यांना सोबत घेवून सागरी सुरक्षेची संबंधित सर्व शासकीय विभाग, मच्छिमार संघटना, सागर रक्षक, जीव रक्षक यांची तातडीने एकत्रित बैठक आयोजित करावी. समुद्र किनारी मागील 10 वर्षांत घडलेल्या पर्यटकांच्या मृत्युच्या घटनांचा आढावा घेण्यात यावा. किनाऱ्यालगतची धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यासाठी एकत्रित भेट देवून त्या ठिकाणच्या सुरक्षात्मक उपाययोजनां कराव्यात. धोकादायक ठिकाणी पर्यटकांना ठळकपणे दिसणारे आवश्यक त्या धोक्याच्या सुचनांचे फलक दिर्घकाळ टिकून राहतील असे लावणे, त्या-त्या भागातील जीवरक्षक, मच्छीमार सघंटनांचे प्रतिनिधी, पोलीस ठाणे, अन्य प्रशासकीय विभाग, आपत्कालीन विभाग इत्यांदींच्या हेल्पलाईन व त्यांचेही संपर्क क्रमांक यांचेही फलक लावणे. धोक्याच्या सुचना देणाऱ्या ऑडिओ, व्हीडीओ, मेसेज सर्वच विभागांनी आपआपल्या वेबसाईडवर व अन्य सोशल मिडियाव्दारे, वृत्तपत्रांव्दारे प्रसारीत करणे, पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी मेगाफोन / लाऊडस्पीकर व्दारे सुरक्षाविषयक सुचना देण्यासाठी यंत्रणा उभारणे इत्यादी सुचना दिल्या.
पोलीस विभाग व बंदर विभाग यांनी एकत्रितरित्या मागील 1 महिन्यात 12 बोटींवर क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक, बोटिंचे सव्र्व्हे नसणे, प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे, बोटींचे पुरक दस्तऐवज नसणे इत्यादी मथळयाखाली रु. 29,900/- ची दंडात्मक कारवाई केलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित पर्यटन उपलब्ध होणे यामागील उद्देश असून यापुढे वॉटर स्पोर्टस, साहसी पर्यटन, प्रवासी बोटी यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, लायसन्स शिवाय वॉटर स्पोर्टस व बोटी चालविणे, पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयक हयगय करणे, पर्यटकांना आवश्यक साधनसामुग्री न पुरविणे किंवा कायदेविषक उल्लंघन निदर्शनास आल्यास त्यांचेवर फौजदारी कारवाई करण्याच्या सुचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत.
पोलीस दलासोबत इतर विभागांनी संयुक्तिक रित्या स्पीड बोटि व इतर बोटिंव्दारे प्रभावी गस्त करुन संशयास्पद बोटी, इसम तपासणे व कायदे/ नियमांचे उल्लंघन झाल्यास आवश्यक ती कायेदशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. ड्रोन व्दारे कमी कालावधीत सुक्ष्मरित्या निरिक्षण करुन आवश्यक ती कारवाई करता येणे सहज शक्य आहे. यासाठी जास्तीत प्रयत्न करावेत. मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ड्रोनच्या माध्यमातून 45 बोटिंवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. मत्स्य विभागाकडे 28 मच्छीमार संघटनांची नोंद असून त्यामध्ये 7000 मच्छीमार सदस्यांची नोंद आहे. या सदस्यांची नोंदणी अल्प प्रमाणात असून जास्तीत जास्त सदस्यांच्या नोंदि होण्यासाठी मत्स्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सर्वच विभागांनी एकत्रितरित्या मच्छीमार संघटनांची बैठक घेवून त्यांची मत्स्य विभागाकडे सदस्य नोंदणी करण्याबाबत सूचना द्याव्यात. मच्छीमार बोटिंवर काम करणारे नेपाळ देशातील कामगार, उडीसा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड इत्यादी राज्यातील परप्रांतीय कामगार जिल्हयामध्ये काम करीत आहेत. ज्यांच्या मालकीच्या बोटिंवर असे कामगार आहेत त्याची कामगार ठेवताना काय काळजी घेतली पाहिजे याचे त्यांना मार्गदर्शन करुन कामगारांचे ओळखपत्र, त्यांचा मूळ पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर इत्यादी माहितीची पडताळणी करुन सदर शाश्वत माहिती संबंधित पोलीस स्टेशन व स्वतःकडे ठेवण्याच्या सुचना द्याव्यात. एकही परप्रांतिय व्यक्ती अपरिचित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावयाची आहे. सूचनांच्या पुर्ततेबाबत पुढील महिन्यात पुनःश्च आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही श्री अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे Facebook - https://www. facebook.com/ Sindhudurg Police07/, Website https://www.sindhudurgpolice.gov.in/, Instagram https://www.instagram.com/spsindhudurg/, X (Twitter) https://x.com/Sindhudurg SP, Sindhudurg Police Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029VaJ2ugi2975EmoT2bn1E, YouTube Channel https://www.youtube.com/@ Sindhudurg Police यावर भेट देवून आवश्यक माहिती व सुविधांचा लाभ घेण्यात यावा.
तसेच, पोलीस दलाची आपत्कालीन हेल्पलाईन 112, कोस्टल हेल्पलाईन 1093, सायबर क्राईम हेल्पलाईन 1930, सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 7036606060, पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग व्हॉटस्अप नं. 8275776213 यावर पोलीस मदतीची सुविधा उपलब्ध आहे.याचाही वापर करावा असे आवाहन केले.