
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून कसाल ग्रामपंचायत वार्ड क्र.२ च्या सदस्या पुजा प्रभाकर आंबेरकर यांच्याकडून अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्य भत्ता व शासनाच्या प्रक्षिशण भत्ता या मिळणार्या रक्कमेतून कसाल मधील भारत विद्यालयाच्या सर्व मुलांना शालेय बॅग व शिवसेना पक्षाच्या वतिने खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमानिमित्ताने कसाल सरपंच राजन परब, शिवसेना विभाग प्रमुख चंदु राणे, साईनाथ आंबेरकर भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर खरात, शिक्षक संदिप शिंगाडे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.