
दोडामार्ग : कुडासे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंचा पूजा देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नम्रता नामदेव देसाई यांची सरपंच म्हणून तर उपसरपंचपदी प्रसाद कुडासकर यांची बिनविरोध निवड झाली.
कुडासे सरपंच पूजा बाबाजी देसाई यांनी गाव बैठकीत ठरल्याप्रमाणे या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले. त्यामुळे या पदासहित उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी कुडासे येथील ग्रामपंचायत संपन्न झाली. सरपंच पदासाठी नम्रता देसाई व उपसरपंच पदासाठी प्रसाद कुडासकर यांनी अर्ज दाखल केले होते. सरपंच पदी नम्रता देसाई व उपसरपंच पदी प्रसाद कुडाळकर यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली.
यावेळी मंडळ अधिकारी राजन गवस, श्री. शिरसाठ, प्रशासकीय अधिकारी श्री. तायडे, शिंदे शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा देसाई, शिंदे शिवसेना महिला उपतालुकाप्रमुख पूजा देसाई, ग्राम महसूल अधिकारी सौ. भंडारे, ग्रामसेवक अशोक गायकवाड, शिंदे शिवसेना विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, कुडासे शिवसेना शाखाप्रमुख किशोर देसाई, संजय धुरी, पोलीस पाटील रेश्मा पाटील, निलेश देसाई, राजाराम देसाई, भाग्यश्री राऊळ यांसह सत्यवान देसाई, संजय धुरी, विनोद शेटये, नामदेव देसाई, काशिनाथ राऊत उपस्थित होते. नूतन सरपंच व उपसरपंच दोघांचेही अभिनंदन करण्यात आले.