
वैभववाडी : सध्याच युग हे विज्ञानाच युग आहे.सर्व क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. माणसांची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे संगणक साक्षरता असणे काळाची गरज बनली आहे असे मत वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले.
अर्जुन रावराणे विद्यालयातील उर्मिलादेवी केशवराव रावराणे सभागृहात सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ मुंबई यांच्यावतीने तालुक्यातील शाळांना संगणक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे,गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याधिकारी प्रतिक थोरात,तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे, शरद नारकर, न.प.सभापती सभापती रोहन रावराणे, रणजित तावडे, बाळाजी रावराणे, प्रकाश पाटील. प्रणय घोगले सी.एस.आर.मोसंबी, सी.एस.आर.ॲड्रॉइट, प्रथमेश रावराणे व अलोक कदम आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जयेंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगणकाचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याने अवगत केले पाहिजे. भविष्य काळात या माध्यमाशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे असे मत श्री रावराणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी मोसंबी व ऍड्रॉइट तसेच रेनकोट इंडिया या संस्थेच्या मागील तीन वर्षांच्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत यावेळी प्रदशित करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मरळकर व आभार किशोर रावराणे यांनी मानले.