
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघांमध्ये राजन तेली यांनी काय दिवे लावले हे येथील जनतेला माहिती आहे आणि म्हणूनचं त्यांना येथील जनतेने तीन वेळा या मतदारसंघातूनच हद्दपार केले. त्यांना मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी प्रथम आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, अशी प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिली.
कोणाकोणाची फसवणूक केली. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये गटातटाचे कसे राजकारण केले. तालुक्या तालुक्यात वाद निर्माण करणा-या राजन तेलींनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर नाहक टीका करु नये. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रथम ज्याची फसवणूक केली. त्यांचे काम करावे. स्वतः कर्म करावे अन दुस-यावर बोट दाखवावे हे शोभत नाही. नितेश राणे पालकमंत्री झाल्यावर जनतेच्या आशा वाढलेल्या आहेत. अनेक प्रश्न सुटत आहेत त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने बेताल वक्तव्ये करत आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने तीन वेळा नाकारल्याने राजन तेली यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करु नये. राजन तेली यांचे खरे रूप जनतेसमोर आणायला वेळ लागणार नाही असे प्रसिद्धी दिलेल्या प्रत्रकात भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी म्हटले आहे.