
सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री आवस योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत कसाल ग्रामपंचायत सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती कसाल गावासाठी ५५ लाभार्थ्यांचे टार्गेट देण्यात आले होते. सदर टार्गेट ग्रामपंचायतीने ८ दिवसापूर्वी पंचायत समिती कुडाळ यांच्या कडे पूर्ण करून सुपूर्द केलं होत. या पैकी गावातील ४३ लाभार्थ्यांना शनिवारी मंजुरीचे पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उर्वरित लाभार्थ्यांना पुढील आठवड्यात मंजुरी पत्र व प्रथम हप्ता देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाला सरपंच तसेच अंगणवाडी सेविका, आशा, तलाठी, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते प्रथमतः पुणे बालेवाडी येथील प्रोजेक्टरच्या माध्यमातून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार यांचा कार्यक्रम दाखवण्यात आला सदर कार्यक्रम संपन्न झाल्यावर सरपंचाच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.
या बाबत सरपंच राजन परब यांनी प्रधानमंत्री आवस योजने बाबत सविस्तर माहिती सांगितली, तसेच सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर मंजूर झालेली घरे बांधून पूर्ण करण्यासाठी आवाहन करण्यात आले . सदर कार्यक्रम चालू असताना उपस्थित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५००० जमा झालेल्या एसएमएस मोबाईल वर आला .