
सावंतवाडी : कुणकेरी - भवानीवाडी येथील मोहन जोगाजी सावंत (८५ वर्ष) यांचे मुलुंड येथे बुधवारी दुपारी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबई महापालिकेच्या भांडुप पाणी पुरवठा योजनेवरून ते सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, सुना, नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.