
दोडामार्ग : नवसाला पावणारा व हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला भरपाल येथील श्री गिरोबा बाबा देवाचा उत्सव शनिवार दि 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
यानिमित्त सकाळपासून विविध भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच सकाळी 10.00 वजाता श्री सत्यनारायण महापूजा, संध्याकाळी ग्रामस्थ्यांचे भजन, व रात्रौ कलेश्वर दशावातर नाट्य मंडळ यांचा मेहंदीपूरचा बालाजी हा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक तसेच नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रोळी युवक मंडळ भरपाल यांनी केले आहे.