
सावंतवाडी : माजगांव पंचक्रोशीतील ग्रंथालयाच्या सुर्वणमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या उद्देशाने विविध शालेय स्पर्धा भाईसाहेब माध्यमिक विद्यालय माजगाव यांच्या सहकार्याने आयोजित केल्या होत्या. याला मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व श्री देवी सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आर के सावंत व अध्यक्षस्थानी माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री चौरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत माजगाव हायस्कूल शिक्षिका माजगावकर यांनी केले. पंचक्रोशीतील सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी सहभागी करून घेतले होते. संस्थेतर्फे प्रकट वाचन, श्लोक पठण ,रंगभरण, चित्रकला हस्ताक्षर ,वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे इयत्ता तिसरी ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटांसार आयोजन केले होते.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, माजी उपसरपंच व संस्था सदस्य संजय कानसे, मीराताई कासार, उपसरपंच रिचर्ड डिमेलो, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, एल के सावंत, मिलिंद कासार कार्यवाह सतीश मालशे, संस्था ग्रंथपाल मधु कुंभार, लिपिका रोशनी निब्रे, सेविका माया साळगावकर, माजगाव हायस्कूल सर्व शिक्षक व शिक्षिका, राजन कासार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्तम प्रकारे प्रदर्शन केले. यावेळी परीक्षक अँड. नकुल पार्सेकर, प्रमोद सावंत, विशाखा पालव, सौ. माजगावकर, एल के सावंत, सिद्धेश कानसे, सौ सावंत, मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.