
वैभववाडी : नापणे येथील रोहीणी चंद्रकांत खांडेकर यांची ४२ हजारांची रुपये रक्कम असलेली पिशवी चोरीला गेली. हा प्रकार मंगळवारी (ता.१८) दुपारी १२वाजण्याच्या सुमारास बसस्थानकात घडला. या प्रकरणी त्या महिलेने बुधवारी पोलीसांत तक्रार दिली.
श्रीमती खांडेकर या महीला बचत गटाचे पैसे काढण्यासाठी मंगळवारी शहरात आल्या होत्या. येथील दोन बॅकामधून त्यांनी ४२हजारांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांनी बाजारात काही खरेदी केली. घरी परतत असताना त्यांच्याजवळ असलेली पैशाची पिशवी नसल्याचे निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलीसांत जाऊन याची माहिती दिली.
पोलीसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते.मात्र यात काहीही सापडले नाही. त्यानंतर आज या महीलेने पोलीसात तक्रार दिली आहे.