
देवगड : देवगड चिरेखाण संघटना यांच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, चिरेखन संघटना अध्यक्ष मिलिंद साटम, खजिनदार बाबा कोकरे, सचिव काका जेठे आधी उपस्थित होते.
देवगड तहसील कार्यालय येथे पुन्हा एकदा नव्याने देवगड येथील तहसीलदार पदाचा कार्यभार तहसीलदार रमेश पवार यांनी हाती घेतला असून पदावर रुजू झालेल्या तहसीलदार रमेश पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. देवगड तहसीलदार कार्यालयात पवार यांचे काही दिवसांपूर्वी आगमन झाले आहे.
त्यामुळे देवगड तालुका चिरेखन संघटनेच्या वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत काही महिन्यांपूर्वी मुबंई येथे पवार यांची प्रशासकीय बदली झाली होती. मात्र पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिक असलेल्या कामकाज पद्धतीमुळे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीने आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. देवगड तहसीलदार म्हणून कामकाज करताना काही महिन्यापुर्वीच पवार यांनी तहसील परिसर कपाउंड, अभ्यंगतांसाठी बैठक व्यवस्था आदी कामकाज करवून घेतले होते. जनतेचा तहसीलदार म्हणून सर्वसामान्य जनमानसात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे विविध संघटनांकडून त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना तहसील कार्यालयात जाऊन शुभेच्छा देण्यात येत आहेत .