![](https://kokansadlive.com/uploads/article/17270_pic_20250215.1941.jpg)
सावंतवाडी : मडुरा येथील व्हि. एन. नाबर मेमोरीयल इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, जेष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई यांच्यासह स्थानिक कमिटीचे अध्यक्ष भिकाजी धुरी, संस्था पदाधिकारी त्रिविक्रम उपाध्ये, श्री. पारकर, बांदा येथील संस्थेच्या शाळेच्या प्राचार्य मनाली देसाई आदी होत्या. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी अॅड. पार्सेकर यांनी या शाळेच्या कार्याचे कौतुक केले. संस्था करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत स्थानिक पातळीवरून आणखी सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
श्री. देसाई यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिक्षा शिरोडकर, सौ. देसाई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पालक संघाचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.