
मंडणगड : राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड इयत्ता 5वी मधील विद्यार्थिनी कुमारी उत्कर्षा कौस्तुभ जोशी हिने विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेत प्राथमिक गटातून मंडणगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. तिला विज्ञान शिक्षक विशाल महाडिक ,जयेश कुलाबकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्था, शालेय समिती चेअरमन, प्रशालेचे मुख्याध्यापक, पालक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..