
मंडणगड : तालुक्यातील वाकवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला श्री. बालाजी डेव्हलपर्स पुणे चे सर्वेसर्वा व पुणे येथील उद्योजक विकास बेंगडे पाटील यांनी टीव्ही संच व साऊंड सिस्टिम भेट दिली.
वाकवली गावचे सरपंच गणेश पेंढारे, शिक्षण कमिटी अध्यक्ष दिलीप धोंडगे, पोलीस पाटील मंगेश केंद्रे, गावातील आदर्श शिक्षक सचिन अबगुल व इतर ग्रामस्थ यांनी बेंगडे पाटील यांचेकडे आमच्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या उद्योग संस्थेकडून टीव्ही संच आणि साऊंड सिस्टिम ची मदत करता आली तर आमच्या मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी मागणी केली असता बेंगडे पाटील यांनी तात्काळ वरील साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावातील सर्व नागरिक व शाळेतील विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
बेंगडे पाटील यांचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच योगदान असते. त्यांच्याकडून पंचक्रोशीतील उमेद फाउंडेशनला पावसाळी सीझनमध्ये रेनकोट भेट देण्यात आले होते. तसेच शेनाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कलर प्रिंटर व यावर्षी राबविण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह स्वरूपातील ट्रॉफींचे सौजन्य विकास बेंगडे पाटील यांच्याकडून देण्यात आले होते. महामाता रमाई आंबेडकर यांचे जयंती निमित्त 6 व 7 फेब्रुवारी रोजी अभिवादन करण्यासाठी येणार्या नागरिकांची मंडनगड येथे चहा- नाश्त्याची व विश्रांतीची सोय व्हावी म्हणुन काम करणार्या नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे यांच्या कार्याला रोख रु. 11000 देणगी दिली. तसेच शनिवारी वाकवली येथे अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वरील साहित्य प्रदान करत असताना श्री. बालाजी डेव्हलपर्सचे व्यवस्थापक अनिल सावंत व अमोल शिंदे यांनी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वरील साहित्य भेट स्वरूपात दिले.
त्यावेळी गावचे सरपंच गणेश पेंढारे, पोलीस पाटील मंगेश केंद्रे, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष दिलीप धोंडगे,सुभाष शिनगारे, स्वप्निल शिनगारे, ज्येष्ठ नागरिक अनंत शिनगारे, आदर्श शिक्षक सचिन अबगुल, मालुसरे सर, कृष्णा कदम,मारुती घडवले, जगन्नाथ शिनगारे, सत्यवान भुवड, मारुती शिनगारे, विजय पवार, उमेश जाधव, विजय पावसकर, संदेश पेंढारे, नथुराम धोंडगे, रमेश जाधव व संतोष शिनगारे इत्यादी उपस्थित होते. वाकवली शाळेचे शिक्षक श्री. मालुसरे यांनी प्रस्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले. श्री बालाजी डेव्हलपर्सच्यावतीने व्यवस्थापक अनिल सावंत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सरपंच गणेश पेंढारे यांनी आभार मानले.